मुख्य सामग्रीवर वगळा

नविन प्रकाशित लेखन

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem






सगळ्यांना सुट्टी मिळाली
कोरोना नावाचा 
राक्षस सगळ्यांसाठीच
विश्रांतीचं गिफ्ट 
घेऊन आला 
सगळे निवांत झाले
शाळेतला गोंगाट 
ऑफिसमधिल लगबग
रस्त्यावरची वरदळ
चाळीतली गडबड
कामावर जाण्याची धांदल
मंदिरातली आरती
मशिदीतली नमाज
सगळं सगळं बंद झालं
बंद झालं नाही फक्त 
स्वयंपाक घरातलं दार
ते सुरूच असतं 
कुठलाही व्हायरस 
ते बंद नाही करू शकत
तिच्या पाचवीलाच पुजलय ते
आज सगळे स्वस्त बसलेत
पण ती आज ही विचारतेय
तिचा तो भाबडा 
प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू 

संजय सकटे

टिप्पण्या

आठवड्यातील लोकप्रिय लेखन

असाह्य marathi Kavita

 तिच्या एका साडीला ईस्ञी करताना  कोण बघत तरी नाही ना ? याचा कानोसा घेत  दहावेळा खिडकीकडे आणि दाराकडे पाहिलं असेल मी पण ती जेव्हा चिखलात आणि घाणीत बरबटलेले माझे बुट अंगणात बसून आनंदी चेहर्‍याने स्वच्छ करताना दिसली तेव्हा खूप अस्वस्थ आणि असाह्य झालं..... संजय सकटे