मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नविन प्रकाशित लेखन

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे
अलीकडील पोस्ट

काही निवडक चारोळ्या Mast Charolya

  कुणीच आता जखमावर मीठ माझ्या चोळत नाही  मीच आता कुणाला मनातलं  काही सांगत नाही  ठणठणीत आहे पाठ माझी खंजीर कुणी मारत नाही  मीच बदलो थोडा  आता मिञ कुणाला म्हणत नाही  कणखर झाले मन ही आता सारखं सारखं रडत नाही  कुणा वाचून मला ही आता फारसा फरक पडत नाही  संपले वाट पाहणे मी आता  कुणालाच शोधत नाही चालता चालता रस्त्यावर मागे वळून बघत नाही  आवडीची फुलं कुणी  तोडायची सोडत नाही  बरं झाल मी ही कुणाला फारसा आवडत नाही  देवाला ही कुठे आता जास्त ञास देत नाही  कुणासाठी त्याच्याशी ही हात जोडून भांडत नाही  संजय सकटे

राहतो आता जगाशी लाबं हाताने... marathi gazal

 राहतो आता जगाशी लाबं हाताने... जरा शिकवला आहे मलाही पाठ काळाने जरा जन्मभर पुरणार नाही एवढेसे दु:ख हे दे मला तू वेदना ही सैल हाताने... जरा खूप खुलतो चेहरा हा लाल झाल्यावर तुझा बघ पुन्हा माझ्याकडे तू फक्त रागाने जरा केवढ्या झाल्यात जखमा ही जुन्या ह्रदयातल्या कर नवी सुरुवात आता खोल घावाने... जरा जीव जळतो केवढा हा बोलण्यासाठी तुला बोलना तू दोन अक्षर फक्त प्रेमाने....... जरा  बोलताना लावते तुम्ही कशाला सांग ना मार ना तू गोड मजला हाक नावाने..जरा जाणतो मी खूप आहे  दुःख छळणारे तुला काढतो मी दृष्ट ये तू चंद्र ताऱ्याने..... जरा चेहरा नाराज  दिसतो का तुझा हा एवढा ओठ राहू दे नको पण हास डोळ्याने जरा संजय सकटे

रुते खोल काटा Marathi Gazal

गजल रुते खोल काटा जसा बाभळीचा तसा वार झाला तुझ्या पापणीचा  कितीदा विझवले दिवे आठवांचे तरी धूर होतो किती... काजळीचा उघडताच डोळे अजुन पाहतो मी पुसट चेहरा का तुझा... घातकीचा तुझी काळजी घेत होतो सखे पण तुला वाटलो मी गडी..... चाकरीचा असर होत आहे तुझ्या... वेदनांचा मला छंद जडला गझल, लेखणीचा उमलल्या जुन्या वेदना काळजाच्या जसा गंध आला कुण्या. पाकळीचा सुई एवढा राग होता तुझा.. पण जणू भासला हा विळा कापणीचा नको जिंकल्याचा असा आव आणू  सखे हारलो मी तुझ्या... वाटणीचा कशाला करू लाड इतके नभाचे कुठे मोह आहे मला.. चांदणीचा संजय सकटे अकलूज

बाबा.....हृदयाला हात घालणारी कविता Marathi kavita Very heart touching

कविता  बाबा, तुम्ही कधीच का  अजारी पडत नाही....? प्रश्न साधाच होता पण  काय उत्तर द्यावे... मी फक्त तिचा चेहरा निहाळत होतो आणि ती माझ्या उत्तराची प्रतिक्षा करत होती. माझ्या गळ्या भोवती कोमल हाताची मिठी अवळून पण कसा सांगू तिला बाबा हे जीवनाच्या नाटकातील एक अस पाञ आहे ज्याला स्वतच्या वेदना,दु:ख,आणि भावनाचां गळा घोटून रंगमचावर आपली भुमिका साकार करावी लागते. शर्त एवढीच कि रडता येत नाही कि कुणाला सांगता ही येत नाही नारळाच्या झाडासारखं  सरळ आणि ताठ उभ राहव लागतं सगळी लेकरं गळ्याशी अवळून येणाऱ्या  प्रत्येक ऊन,वारा आणि  कायदुळीत ही. पण  नाही सांगू शकलो तिला हे सगळं तिला फक्त एवढंच बोललो ॥ ''बाळा तुझा हसरा चेहरा  दिसला कि माझं आजारपण भुर्रकन उडून जातं.....चिमणीसारखं'' संजय सकटे अकलूज

श्वास घेतो फक्त मी शहरात आहे Marathi Best Gazal

  श्वास घेतो फक्त मी शहरात आहे जीव माझा आज ही गावात आहे  कोण नाही घेत आता पुण्य येथे चांगली मिळकत म्हणे पापात आहे  पाळतू झाली करारी लेखणी ही घातली वेसन तिच्या नाकात आहे  सोसते चुपचाप चटके ते उन्हाचे  पावसाच्या शेतही जाचात आहे मास्क मूर्त्यानां बघितले घातलेले  जीव जाण्याची भिती देवात आहे   फक्त शहरांचे उभे स्मशान झाले  गाव माझे आज ही थाटात आहे उघड डोळे फक्त तू संजय तुझे हे दूरदृष्टी वर तुझ्या...... नावात आहे  संजय सकटे  8668733851

रिकामा होत आहे कोपरा बहुतेक हृदयाचा Marathi Emotional Gazal

वेदनांचे रान  रिकामा होत आहे कोपरा बहुतेक हृदयाचा मला आवाज येतो सारखा आतून रडण्याचा किनाऱ्याला कसा आलो मला कळले कसे नाही खरा ठरला असावा तु दिलेला शाप जगण्याचा मला बोलायचे होते तुला पण बोललो नाही चुकीचा अर्थ माझ्या वाटले घेशील म्हणण्याचा मिठी साधीच होती मी तुला जी मारली होती अता ती वाटते आहे जणू आधार जगण्याचा संजय सकटे