मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नविन प्रकाशित लेखन

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे

काही निवडक चारोळ्या Mast Charolya

  कुणीच आता जखमावर मीठ माझ्या चोळत नाही  मीच आता कुणाला मनातलं  काही सांगत नाही  ठणठणीत आहे पाठ माझी खंजीर कुणी मारत नाही  मीच बदलो थोडा  आता मिञ कुणाला म्हणत नाही  कणखर झाले मन ही आता सारखं सारखं रडत नाही  कुणा वाचून मला ही आता फारसा फरक पडत नाही  संपले वाट पाहणे मी आता  कुणालाच शोधत नाही चालता चालता रस्त्यावर मागे वळून बघत नाही  आवडीची फुलं कुणी  तोडायची सोडत नाही  बरं झाल मी ही कुणाला फारसा आवडत नाही  देवाला ही कुठे आता जास्त ञास देत नाही  कुणासाठी त्याच्याशी ही हात जोडून भांडत नाही  संजय सकटे

राहतो आता जगाशी लाबं हाताने... marathi gazal

 राहतो आता जगाशी लाबं हाताने... जरा शिकवला आहे मलाही पाठ काळाने जरा जन्मभर पुरणार नाही एवढेसे दु:ख हे दे मला तू वेदना ही सैल हाताने... जरा खूप खुलतो चेहरा हा लाल झाल्यावर तुझा बघ पुन्हा माझ्याकडे तू फक्त रागाने जरा केवढ्या झाल्यात जखमा ही जुन्या ह्रदयातल्या कर नवी सुरुवात आता खोल घावाने... जरा जीव जळतो केवढा हा बोलण्यासाठी तुला बोलना तू दोन अक्षर फक्त प्रेमाने....... जरा  बोलताना लावते तुम्ही कशाला सांग ना मार ना तू गोड मजला हाक नावाने..जरा जाणतो मी खूप आहे  दुःख छळणारे तुला काढतो मी दृष्ट ये तू चंद्र ताऱ्याने..... जरा चेहरा नाराज  दिसतो का तुझा हा एवढा ओठ राहू दे नको पण हास डोळ्याने जरा संजय सकटे

रुते खोल काटा Marathi Gazal

गजल रुते खोल काटा जसा बाभळीचा तसा वार झाला तुझ्या पापणीचा  कितीदा विझवले दिवे आठवांचे तरी धूर होतो किती... काजळीचा उघडताच डोळे अजुन पाहतो मी पुसट चेहरा का तुझा... घातकीचा तुझी काळजी घेत होतो सखे पण तुला वाटलो मी गडी..... चाकरीचा असर होत आहे तुझ्या... वेदनांचा मला छंद जडला गझल, लेखणीचा उमलल्या जुन्या वेदना काळजाच्या जसा गंध आला कुण्या. पाकळीचा सुई एवढा राग होता तुझा.. पण जणू भासला हा विळा कापणीचा नको जिंकल्याचा असा आव आणू  सखे हारलो मी तुझ्या... वाटणीचा कशाला करू लाड इतके नभाचे कुठे मोह आहे मला.. चांदणीचा संजय सकटे अकलूज

बाबा.....हृदयाला हात घालणारी कविता Marathi kavita Very heart touching

कविता  बाबा, तुम्ही कधीच का  अजारी पडत नाही....? प्रश्न साधाच होता पण  काय उत्तर द्यावे... मी फक्त तिचा चेहरा निहाळत होतो आणि ती माझ्या उत्तराची प्रतिक्षा करत होती. माझ्या गळ्या भोवती कोमल हाताची मिठी अवळून पण कसा सांगू तिला बाबा हे जीवनाच्या नाटकातील एक अस पाञ आहे ज्याला स्वतच्या वेदना,दु:ख,आणि भावनाचां गळा घोटून रंगमचावर आपली भुमिका साकार करावी लागते. शर्त एवढीच कि रडता येत नाही कि कुणाला सांगता ही येत नाही नारळाच्या झाडासारखं  सरळ आणि ताठ उभ राहव लागतं सगळी लेकरं गळ्याशी अवळून येणाऱ्या  प्रत्येक ऊन,वारा आणि  कायदुळीत ही. पण  नाही सांगू शकलो तिला हे सगळं तिला फक्त एवढंच बोललो ॥ ''बाळा तुझा हसरा चेहरा  दिसला कि माझं आजारपण भुर्रकन उडून जातं.....चिमणीसारखं'' संजय सकटे अकलूज

श्वास घेतो फक्त मी शहरात आहे Marathi Best Gazal

  श्वास घेतो फक्त मी शहरात आहे जीव माझा आज ही गावात आहे  कोण नाही घेत आता पुण्य येथे चांगली मिळकत म्हणे पापात आहे  पाळतू झाली करारी लेखणी ही घातली वेसन तिच्या नाकात आहे  सोसते चुपचाप चटके ते उन्हाचे  पावसाच्या शेतही जाचात आहे मास्क मूर्त्यानां बघितले घातलेले  जीव जाण्याची भिती देवात आहे   फक्त शहरांचे उभे स्मशान झाले  गाव माझे आज ही थाटात आहे उघड डोळे फक्त तू संजय तुझे हे दूरदृष्टी वर तुझ्या...... नावात आहे  संजय सकटे  8668733851

रिकामा होत आहे कोपरा बहुतेक हृदयाचा Marathi Emotional Gazal

वेदनांचे रान  रिकामा होत आहे कोपरा बहुतेक हृदयाचा मला आवाज येतो सारखा आतून रडण्याचा किनाऱ्याला कसा आलो मला कळले कसे नाही खरा ठरला असावा तु दिलेला शाप जगण्याचा मला बोलायचे होते तुला पण बोललो नाही चुकीचा अर्थ माझ्या वाटले घेशील म्हणण्याचा मिठी साधीच होती मी तुला जी मारली होती अता ती वाटते आहे जणू आधार जगण्याचा संजय सकटे

सांगून कुणाला कळते......Marathi All Time hit kavita

 सांगून कुणाला कळते का मुक्या मनाचे रडणे हे ओझे असते अपले अन एकटेच धरपडणे फाडून कशी फेकावी ही कविता कळले नाही मी लिहिली हृदयावरती हे पान वहीचे नाही तू ऊन कोवळे माझे मी तुझा अडोसा होतो तू मला हवीशी होती मी तुला नकोसा होतो रडल्यावर संपून जावी कळ इतकी साधी नाही आयुष्य राख करणाऱ्या असतात वेदना काही इतकेच मला नात्यानी शिकवून काढले आहे नसतेच आपले कोणी चांगले समजले आहे संजय सकटे

मग मी पाटी नसलेल्या गाडीत बसलो...(Marathi emotional kavita)

असाह्य marathi Kavita

 तिच्या एका साडीला ईस्ञी करताना  कोण बघत तरी नाही ना ? याचा कानोसा घेत  दहावेळा खिडकीकडे आणि दाराकडे पाहिलं असेल मी पण ती जेव्हा चिखलात आणि घाणीत बरबटलेले माझे बुट अंगणात बसून आनंदी चेहर्‍याने स्वच्छ करताना दिसली तेव्हा खूप अस्वस्थ आणि असाह्य झालं..... संजय सकटे

भिंत (गजल) marathi gazal

 फसून झाली चूक मनाची  उगीच केली हाव विषाची  कुणीच नाही बोलायाला  म्हणून पडली भिंत घराची  कोण कुणाला जिवंत करतो बघून जाणे रीत जगाची  सुगंध देते चुरगळूनही  खूप अडाणी जात फुलांची मरून झाले अनेक वेळा  जीव पाहतो वाट कुणाची बघूनही ती पुढेच गेली भिती वाटली तिला कशाची संजय सकटे

हात हातातला सैल सोडू नको

                                                                                    वेळ जाईल ही धीर सोडू नको  हात हातातला सैल पाडू नको चालली आपली ही परीक्षा खरी चाल विश्वास ठेवून माझ्यावरी हार मानून माघार घेवू नको वेळ जाईल ही धीर सोडू नको चाललो आजवर सोबतीने तुझ्या  वाट झाली सुकर संगतीने तुझ्या स्वप्न इतक्यात मातीत गाडू नको वेळ जाईल ही धीर सोडू नको  तू नको सारखी काळजीने रडू  येऊ दे संकटे सोबतीने लढू जीवनाला दबावात ओढू नको वेळ जाईल ही धीर सोडू नको  विस्कटू दे घराला पुन्हा सावरू सांडलेल्या सुखाला दमाने भरू गोड संसार आसाच मोडू नको  वेळ जाईल ही धीर सोडू नको  संजय सकटे

भावनांचा डोंगर marathi best poem

 सगळच स्पष्ट बोलावं लागतं आता  तुला कळत नाहीत माझ्या मिटलेल्या ओठांचे अर्थ तुझे हातही थरथरतात आता माझ्या हातात आल्यावर ,परपुरुषी स्पर्ष झाल्यासारखा तुझे डोळे ही पहिल्यासारखं बोलत नाहीत गप्प गप्प असतात तुझ्या ओठातून पडणारा प्रत्येक शब्द विस्तवासारखा जाळत जातो तुला आता कळत नाहीत माझ्या चेहऱ्यावर लिहिलेल्या व्याकुळलेल्या कविताचे अर्थ तुला आता सगळच स्पष्ट सांगावं लागतं पण प्रत्येक वेळेस भावनांचा डोंगर करणं शक्य होईलच असं नाही संजय सकटे

कोरी पानं marathi kavita

 किती अवघड  लिहिलंयस सगळं सगळा गिचमिट काला  कुठल्याच शब्दाचा धड अर्थ लागत नाही भिक्षेत मिळालेल्या अन्नासारखी सगळी भेळमिसळ करून टाकलीस  कसं वाचवं वाचनाऱ्याने तू लिहून मोकळा होतोस  हात झिडकारून संदर्भ लावताना आमची माञ  खूप दमछाक होते रे आणि तू मज्जा घेतोस  एखादया त्रयस्थासारखा सगळं बघत असतोस हसतमुखाने जग याला आयुष्य म्हणतं आम्ही म्हणतो कविता  जी कधीच कुणाला कळली नाही आणि तू आमचा कवी ढगाआड लपून आमची कोरी पानं  काळी करणारा....... संजय सकटे

गजल marathi gazal

तोडलेल्या मनाचे करू काय मी तू दिलेल्या उन्हाचे करू काय मी सुख घेऊन गेलीस सोबत तुझ्या मोकळ्या या घराचे करू काय मी तूच नाहीस आहेत सारे इथे पोरक्या या जगाचे करु काय मी संजय सकटे