सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट घेऊन आला सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं कुठलाही व्हायरस ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू संजय सकटे
वेळ जाईल ही धीर सोडू नको
हात हातातला सैल पाडू नको
चालली आपली ही परीक्षा खरी
चाल विश्वास ठेवून माझ्यावरी
हार मानून माघार घेवू नको
वेळ जाईल ही धीर सोडू नको
चाललो आजवर सोबतीने तुझ्या
वाट झाली सुकर संगतीने तुझ्या
स्वप्न इतक्यात मातीत गाडू नको
वेळ जाईल ही धीर सोडू नको
तू नको सारखी काळजीने रडू
येऊ दे संकटे सोबतीने लढू
जीवनाला दबावात ओढू नको
वेळ जाईल ही धीर सोडू नको
विस्कटू दे घराला पुन्हा सावरू
सांडलेल्या सुखाला दमाने भरू
गोड संसार आसाच मोडू नको
वेळ जाईल ही धीर सोडू नको
संजय सकटे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा