मुख्य सामग्रीवर वगळा

नविन प्रकाशित लेखन

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे

भावनांचा डोंगर marathi best poem

 सगळच स्पष्ट बोलावं
लागतं आता 

तुला कळत नाहीत
माझ्या मिटलेल्या ओठांचे अर्थ
तुझे हातही
थरथरतात आता माझ्या हातात
आल्यावर ,परपुरुषी स्पर्ष झाल्यासारखा
तुझे डोळे ही पहिल्यासारखं
बोलत नाहीत गप्प गप्प असतात
तुझ्या ओठातून
पडणारा प्रत्येक शब्द विस्तवासारखा
जाळत जातो
तुला आता कळत नाहीत
माझ्या चेहऱ्यावर लिहिलेल्या
व्याकुळलेल्या कविताचे अर्थ
तुला आता सगळच स्पष्ट सांगावं लागतं
पण प्रत्येक वेळेस भावनांचा
डोंगर करणं
शक्य होईलच
असं नाही


संजय सकटे

टिप्पण्या

आठवड्यातील लोकप्रिय लेखन

असाह्य marathi Kavita

 तिच्या एका साडीला ईस्ञी करताना  कोण बघत तरी नाही ना ? याचा कानोसा घेत  दहावेळा खिडकीकडे आणि दाराकडे पाहिलं असेल मी पण ती जेव्हा चिखलात आणि घाणीत बरबटलेले माझे बुट अंगणात बसून आनंदी चेहर्‍याने स्वच्छ करताना दिसली तेव्हा खूप अस्वस्थ आणि असाह्य झालं..... संजय सकटे