सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट घेऊन आला सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं कुठलाही व्हायरस ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू संजय सकटे
"वेदना जगणाऱ्या प्रत्येकाचं पान" माझ्या कविता आणि गजला सोबत मराठी चारोळ्या आणि आवडत्या नवकवीच्या कविता नक्की वाचा मराठी कविताचं मुक्त व्यासपीठ Marathi kavita, Marathi Charolya ani Marathi Statues ani Marathi gazal

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा