सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट घेऊन आला सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं कुठलाही व्हायरस ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू संजय सकटे
फाडून कशी फेकावी
ही कविता कळले नाही
मी लिहिली हृदयावरती
हे पान वहीचे नाही
तू ऊन कोवळे माझे
मी तुझा अडोसा होतो
तू मला हवीशी होती
मी तुला नकोसा होतो
रडल्यावर संपून जावी
कळ इतकी साधी नाही
आयुष्य राख करणाऱ्या
असतात वेदना काही
इतकेच मला नात्यानी
शिकवून काढले आहे
नसतेच आपले कोणी
चांगले समजले आहे
संजय सकटे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा