मुख्य सामग्रीवर वगळा

नविन प्रकाशित लेखन

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे

श्वास घेतो फक्त मी शहरात आहे Marathi Best Gazal

 



श्वास घेतो फक्त मी शहरात आहे
जीव माझा आज ही गावात आहे 

कोण नाही घेत आता पुण्य येथे
चांगली मिळकत म्हणे पापात आहे

 पाळतू झाली करारी लेखणी ही
घातली वेसन तिच्या नाकात आहे 

सोसते चुपचाप चटके ते उन्हाचे 
पावसाच्या शेतही जाचात आहे

मास्क मूर्त्यानां बघितले घातलेले 
जीव जाण्याची भिती देवात आहे
 
फक्त शहरांचे उभे स्मशान झाले 
गाव माझे आज ही थाटात आहे

उघड डोळे फक्त तू संजय तुझे हे
दूरदृष्टी वर तुझ्या...... नावात आहे 


संजय सकटे 
8668733851

टिप्पण्या

आठवड्यातील लोकप्रिय लेखन

असाह्य marathi Kavita

 तिच्या एका साडीला ईस्ञी करताना  कोण बघत तरी नाही ना ? याचा कानोसा घेत  दहावेळा खिडकीकडे आणि दाराकडे पाहिलं असेल मी पण ती जेव्हा चिखलात आणि घाणीत बरबटलेले माझे बुट अंगणात बसून आनंदी चेहर्‍याने स्वच्छ करताना दिसली तेव्हा खूप अस्वस्थ आणि असाह्य झालं..... संजय सकटे