सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट घेऊन आला सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं कुठलाही व्हायरस ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू संजय सकटे
जन्मभर पुरणार नाही एवढेसे दु:ख हे
दे मला तू वेदना ही सैल हाताने... जरा
खूप खुलतो चेहरा हा लाल झाल्यावर तुझा
बघ पुन्हा माझ्याकडे तू फक्त रागाने जरा
केवढ्या झाल्यात जखमा ही जुन्या ह्रदयातल्या
कर नवी सुरुवात आता खोल घावाने... जरा
जीव जळतो केवढा हा बोलण्यासाठी तुला
बोलना तू दोन अक्षर फक्त प्रेमाने....... जरा
बोलताना लावते तुम्ही कशाला सांग ना
मार ना तू गोड मजला हाक नावाने..जरा
जाणतो मी खूप आहे दुःख छळणारे तुला
काढतो मी दृष्ट ये तू चंद्र ताऱ्याने..... जरा
चेहरा नाराज दिसतो का तुझा हा एवढा
ओठ राहू दे नको पण हास डोळ्याने जरा
संजय सकटे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा