सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट घेऊन आला सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं कुठलाही व्हायरस ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू संजय सकटे
कविता
बाबा, तुम्ही कधीच का
अजारी पडत नाही....?
प्रश्न साधाच होता पण
काय उत्तर द्यावे...
मी फक्त तिचा चेहरा
निहाळत होतो
आणि ती माझ्या उत्तराची प्रतिक्षा
करत होती. माझ्या गळ्या भोवती
कोमल हाताची
मिठी अवळून
पण कसा सांगू तिला
बाबा हे जीवनाच्या
नाटकातील एक अस पाञ
आहे ज्याला स्वतच्या
वेदना,दु:ख,आणि
भावनाचां गळा घोटून
रंगमचावर आपली
भुमिका साकार करावी लागते.
शर्त एवढीच कि रडता येत नाही
कि कुणाला सांगता ही येत नाही
नारळाच्या झाडासारखं
सरळ आणि ताठ उभ राहव लागतं
सगळी लेकरं
गळ्याशी अवळून येणाऱ्या
प्रत्येक ऊन,वारा आणि
कायदुळीत ही.
पण
नाही सांगू शकलो तिला हे सगळं
तिला फक्त एवढंच बोललो ॥
''बाळा तुझा हसरा चेहरा
दिसला कि माझं आजारपण
भुर्रकन उडून जातं.....चिमणीसारखं''
संजय सकटे
अकलूज

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा