मुख्य सामग्रीवर वगळा

नविन प्रकाशित लेखन

भाबडा प्रश्न Marathi very toucheble poem

सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा  राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट  घेऊन आला  सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट  ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त  स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं  कुठलाही व्हायरस  ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा  प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू  संजय सकटे

काही निवडक चारोळ्या Mast Charolya

 


कुणीच आता जखमावर मीठ
माझ्या चोळत नाही 
मीच आता कुणाला मनातलं 
काही सांगत नाही 


ठणठणीत आहे पाठ माझी
खंजीर कुणी मारत नाही 
मीच बदलो थोडा 
आता मिञ कुणाला म्हणत नाही 

कणखर झाले मन ही आता
सारखं सारखं रडत नाही 
कुणा वाचून मला ही आता
फारसा फरक पडत नाही 

संपले वाट पाहणे मी आता 
कुणालाच शोधत नाही
चालता चालता रस्त्यावर
मागे वळून बघत नाही 

आवडीची फुलं कुणी 
तोडायची सोडत नाही 
बरं झाल मी ही कुणाला
फारसा आवडत नाही 

देवाला ही कुठे आता
जास्त ञास देत नाही 
कुणासाठी त्याच्याशी ही
हात जोडून भांडत नाही 


संजय सकटे

टिप्पण्या

आठवड्यातील लोकप्रिय लेखन

असाह्य marathi Kavita

 तिच्या एका साडीला ईस्ञी करताना  कोण बघत तरी नाही ना ? याचा कानोसा घेत  दहावेळा खिडकीकडे आणि दाराकडे पाहिलं असेल मी पण ती जेव्हा चिखलात आणि घाणीत बरबटलेले माझे बुट अंगणात बसून आनंदी चेहर्‍याने स्वच्छ करताना दिसली तेव्हा खूप अस्वस्थ आणि असाह्य झालं..... संजय सकटे